Ahilyanagar: संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शिवसेना व भाजप सरसावली
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांना शिंदेसेना आणि भाजपकडून जोरदार प्रचाररॅली काढण्यात आली.
अहिल्यानगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शहरात शिवसेना व भाजप सरसावली असून, रेल्वे स्टेशन रोड, आगरकर मळा परिसरात भाजप, सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित प्रचार फेरी काढली. या प्रचार फेरीत सहभागी होऊन आ. संग्राम जगताप यांनी नागरिकांच्या गाठी-भेटी घेऊन मतदारांना शहराच्या विकासासाठी पुन्हा संधी देण्याची साद घातली.शहर विकासाची हाक देत काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीस सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे व भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांनी या प्रचार रॅलीचे नेतृत्व केले.