वाई येथे एका धोकादायक रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असून तो मृत्यूचा सापळा ठरत आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची जोरदार मागणी…
Indian National Congress पक्षाच्या ‘सृजन अभियानाची’ सुरुवात सातारा येथे करण्यात आली. या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे आमदार Malinder Rajan यांची प्रमुख उपस्थिती होती.
मे महिन्यात तुळजाभवानी मंदिरातील विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी दिली आहे.
म्हसोबाची वाडी येथे ९४ व्या नारळी सप्ताहाचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे १ लाख भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. ९ थेट सरपंच पदे आणि ३४ सदस्यपदे अशा एकूण ४३ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
Maharashtra CM Fellowship Program: महाराष्ट्र सरकारने 'सीएम फेलोशिप प्रोग्राम'ची घोषणा केली आहे. आता २१ ते २६ वयोगटातील पदवीधरांना थेट मंत्रालयात काम करून अनुभव आणि उत्तम पगार मिळवता येईल.
युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडरला पर्याय म्हणून रॉकेल वितरणाचा निर्णय घेतला असला, तरी पुणे जिल्ह्यासाठी मंजूर झालेला कोटा अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, सरकारी रुग्णालयांतील पारदर्शकता आणि जबाबदारी अधिक बळकट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
निवडणुका संपल्यानंतर आता पक्षवाढीवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांना दिले आहेत. संघटन मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसानभरपाईसाठी शासनाकडे मागणी करण्यात येत आहे.
एसटीतील अकार्यकारी अधिकाऱ्यांवर मनमानीचे आरोप होत असून,प्रशासनाने नेमलेली चौकशी समिती अर्धवट राहिल्याचा आरोप श्रीरंग बरगे यांनी केला आहे. या प्रकरणामुळे एसटी प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Maharashtra ST Bus Fare Hike : उन्हाळ्यात एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एसटी महामंडळाने 15 एप्रिलपासून बसच्या तिकीट दरांत वाढ होणार असल्याची माहिती दिली.
धाराशिव जिल्ह्यात बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत बनावट सह्या व शिक्क्यांच्या आधारे लाखोंचा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून तपासाची मागणी करण्यात येत आहे.
धाराशिव जिल्ह्यात ‘हर घर संविधान’ उपक्रमावर घोटाळ्याची सावली पडली असून उद्देशिका फ्रेम वितरणात अनियमिततेचे आरोप होत आहेत. या प्रकरणामुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन सिंचन विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २४३ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून सुमारे ६०० शेतकरी प्रभावित झाले आहेत. नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
अमरावती जिल्ह्यात १०२ टक्के पाऊस झाला तरीही पाणीटंचाईचे संकट निर्माण झाली. जलसाठ्याचे योग्य नियोजन न झाल्याने आणि भूजल पातळी घटल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचे मानले जात आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड हालचालींना वेग आला असून, सर्वांचे लक्ष मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी होणाऱ्या स्थायी आणि विषय समिती सदस्य निवड प्रक्रियेकडे लागले आहे.