अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या आवारात पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात पावसाळ्यातील औषधी आणि गुणकारी रानभाज्या विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांनी उभारलेल्या स्टॉलमधून आघाडा, शेवळा, भारंग, करटोळी, टाकळा यांसारख्या पारंपरिक भाज्या शहरी नागरिकांना उपलब्ध झाल्या. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराची संधी आणि शहरी भागाला आरोग्यदायी अन्न मिळण्याचा लाभ झाला.