नवी मुंबई येथील एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चीनची द्राक्ष विक्रीला उपलब्ध झाली आहेत. चिन मधून आलेल्या द्राक्षांना मोठी मागणी वाढली आहे. 200 ते 300 रुपये किलो दराने हे द्राक्ष एपीएमसीत विक्री होतात. तर राज्यात पावसामुळे यंदा तब्बल सत्तर टक्के द्राक्षाचे उत्पादन घटले आहे. यामुळे परदेशातील द्राक्षाला वाढती मागणी आहे. सध्या चीनमधून दररोज द्राक्षांच्या दोन हजार पेट्यांची आवक मुंबई एपीएमसीत होत आहे. तसेच चीनमधील द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे. या पाच किलोच्या द्राक्ष पेट्यांना १५०० ते १६०० रुपये दर मिळत आहे. म्हणजे जवळपास २५० ते ३०० रुपये किलो असा भाव मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये मिळतो आहे. त्यामध्ये मस्कत, सफायर, रेड ग्लोब, क्रिमसन जातीच्या द्राक्षांचा समावेश आहे.तर जानेवारी अखेर महाराष्ट्रातील आणि जून, जुलै महिन्यात कॅलिफोर्निया आणि दक्षिण आफ्रिकेतील द्राक्षांची आवक होणार असल्याची माहिती घाऊक फळ व्यापारी पानसरे यांनी दिली आहे