VIDEO | दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला, (वॉर्ड १९१ पुनर्रचनेपूर्वी) २०१२ निवडणुकीत सेनेच्या गडाला मनसेने पाडले होते खिंडार
सध्या मुंबई महानगरपालिकात प्रशासक नेमण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुका पुढील पाच ते सहा महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे, पण सर्वच राजकीय पक्ष पालिका निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करत आहेत, (१९१ वार्ड क्रमांक पुनर्रचनापूर्वी) हा दादरचा प्रभाग मुख्यत्व: शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. २०१७ निवडणुकीत मनसेच्या स्वप्न देशपांडे यांचा पराभव करत माजी महापौर विशाखा राऊत या विजयी झाल्या होत्या. तसेच हा विभाग मराठी बहुल असल्यामुळे येथे मराठी माणसांचा कल हा शिवसेनेलाच आहे. या वार्डचे नेमके काय चित्र आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमृत यांनी ...