गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या विज्ञान आणि नवकल्पनांना व्यासपीठ देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी तर्फे प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. देवरी येथे भरलेल्या या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्यातील तब्बल 34 आश्रमशाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित आकर्षक मॉडेल्स, नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पना आणि रोजच्या वापरातील तंत्रज्ञानात सुधारणा करणारी प्रकल्प मॉडेल्स प्रदर्शनात सादर केली. विशेष म्हणजे अनेक प्रयोगांचे थेट प्रात्यक्षिक (डेमो) सुद्धा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी करून दाखवले आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.