"एवढ्या मोठ्या संख्येने भाजप उमेदवार निवडून कसे आले"? अरुण भाई गुजराती यांचा सवाल

चोपडा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी कसे झाले , असा सवाल अरुण भाई गुजराती यांनी केला आहे.

राजकारणात चढ उतार सुरु असते, राज्यात बहुतांशी महायुतीचे उमेदवार निवडणून आले आहेत. निवडणूक आयोगाचा निकाल मान्य असला तरी एवढ्या मोठ्या संख्य़ेने भाजपाचे उमेदवार कसे निवडून आले याचं कारण कळत नाही. असं मत विधानसभा माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी व्यक्त केलं आहे.