शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व उमेदवार विष्णू भंगाळे आपल्या प्रभागात प्रचार करत असताना त्यांना एक महिला शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत प्रभागात विकास कामे केली नसल्याचा आरोप करताना एक महिला दिसत होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विष्णू भंगाळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सदर महिला ही वार्डात देखील राहत नाही, विरोधी उमेदवाराने षडयंत्र रचले, व्हिडिओ काढला व तो व्हायरल केला असा आरोप भंगाळे यांनी केला आहे. आपले महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे, पक्षातील देखील काही लोक त्यात सहभागी असू शकतात असा आरोप देखील त्यांनी केला आहे.