जळगाव शहरा जवळील बांभोरी पुलावर कंटेनर आणि कारचा अपघात झाला. या अपघातात धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. 30 जुलै रोजी झालेल्या पावसात बायपास महामार्गावरील रेल्वेचा पूल खचला आहे. हा पूल खचल्यामुळे महामार्गावरील वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव शहरात अपघातांचे सत्र सुरू झाले आहे. अडीच महिन्यात झालेल्या विविध अपघातात आतापर्यंत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे.