जयकुमार शिंदे. जयकुमार शिंदे याना भेटल्यानंतर हाडाचा कार्यकर्ता म्हणजे नेमकं काय ते उमगतं. 1976 ला रिक्षा चालक असलेले शिंदे यांना राजकारणाची आवड होती आणि त्यातूनच 1980 मध्ये तयांनी एस काँग्रेस मध्ये प्रवेश केला, तेव्हा पासून आजतागायत ते शरद पवारांच्या सोबत आहेत. आपल्या उमेदीच्या काळात अनेक आंदोलने त्यांनी केली होती मात्र आताची कार्यकर्ते आणि नेते यांना पाहून त्यांचं मन विषन्न होत. पूर्वीच्या आंदोलनात आणि आताच्या आंदोलनात फार फरक आहे आताची आंदोलने मॅनेज केली जातात पूर्वी असे होत नव्हते अनेक आंदोलनात केसेस अंगावर घेतल्या असे शिंदे सांगतात.
नेत्याला मोठं करणारा हा कार्यकर्ताच असतो असे सांगायला ते विसरत नाही. टोलच्या आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली होती अनेक आंदोलने करायचो, पक्षासाठी काम केलं पण घराकडे फार लक्ष देता आल नाही असे सांगत त्यांनी आपल्या मनातली व्यथा मांडली, राजकारणात धडाडीने काम केलं पूर्वीच्या नेत्यांनी मदत केली पण नंतरच्या काळात हसन मुश्रीफ यांनी केवळ आणि केवळ आश्वासने दिली आणि याच आश्वासनांच्या आशेवर बसलेला हाताला आलेला मुलगा गमावला. पूर्वीचे नेते मंडळी कार्यकर्त्यांची विचारपूस करायची मात्र आता कार्यकर्ता होणे मुश्किल आहे, कार्यकर्ता जगवण्याची आणि वाढवण्याची आताच्या नेत्याची प्रवृत्ती दिसत नाही असे ते म्हणाले.