नागपूर महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शहरात एकूण ३००४ मतदान केंद्रे असून त्यापैकी ३२१ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवरील साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरू असून सर्व व्यवस्था काटेकोरपणे पूर्ण केली जात आहे. उद्याच्या मतदानासाठी सुमारे १६ हजार निवडणूक कर्मचारी कर्तव्यावर असतील, तर सुरक्षेसाठी साडेपाच हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार आहेत.संवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.