नवी मुंबई मनपाच्या नेरुळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलाय. वंचितचे सिवूड विभाग अध्यक्ष ऍड उमेश हातेकर यांनी माहिती अधिकारातून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी, कॉन्ट्रॅक्ट पेपरची माहिती मागवली असता यातून हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वंचितने केलाय. कर्मचाऱ्यांचे ज्यादा दिवस दाखवून वाढीव बिल लावून साधारण 4 ते 5 लाख रुपये प्रति महिना हा भ्रष्टाचार होत आहे. रुग्णालयात सफाईसाठी असलेल्या मशीनचा वापर करण्यात येतं नाही तसेच कर्मचाऱ्यांच्या पी.एफची रक्कम भरण्यात येतं नसून देखिल रुग्णालय अधीक्षकांमार्फत कंत्राटदाराची बिलं सगळं काही सुरळीत असल्याचे दाखवून मंजूर केली जात आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे तसेचकंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून कारवाई करण्याची मागणी वंचिततर्फे करण्यात आलेय.