खिडूकपाडा येथे प्रभूदास भोईर यांच्या वतीने आयोजित दत्त जयंती उत्सवाला यंदा विशेष उत्साह लाभला. 22 वर्षांची अखंड परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक उत्सवात हरीकीर्तन, हरिपाठ, भजन, अभिषेक, होम–हवन, महापूजा आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भाविकांची मोठी गर्दी झाली. जत्रेचा माहोल आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी उत्सवाला आणखी आकर्षण प्राप्त झाले.या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांची विशेष उपस्थिती. दोन्ही मान्यवरांनी मनोभावे श्री दत्तांचे दर्शन घेतले आणि आयोजकांचे कौतुक केले. प्रभूदास भोईर हे भाजप वाहतूक संघटनेचे राज्याध्यक्ष असून त्यांनी ग्रामस्थांच्या सहभागातून दत्त जयंती उत्सव भव्य स्वरूपात यशस्वी केला.