सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वीस प्रभागांसाठी आणि 78 नगरसेवक पदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनुक्रमे मशीन खराब असणे,बोटावरील शाई पुसली जाणे, बोगस मतदान, आणि मतदान मशीनच बंद पडणे सारख्या घटना घडल्या. दरम्यान मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच मध्ये दीड ते दोन तास मशीन बंद पडल्याने मतदारांना मतदान केंद्रावरच ताटकळत उभे राहावे लागले. या दोन तासांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याने उमेदवार चंद्रकांत मेनगुरे यांनी तेवढाच वेळ वाढवून देण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली.