सोलापूर महानगरपालिकाच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीच्या मुद्द्यावरून आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गोंधळ उडाला. भारतीय जनता पक्षाने ९ पैकी ८ नावे जाहीर केल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत सभागृहात घोषणाबाजी केली. परिस्थिती इतकी चिघळली की काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक थेट महापौरांच्या व्यासपीठावर धावून गेले. सभेत स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा विषय मांडण्यात आला असता भारतीय जनता पक्षने ९ पैकी ८ नावे जाहीर केली. मात्र एक नाव प्रलंबित ठेवल्याने विरोधकांनी पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित केला. ९ पैकी ९ नावे एकाच वेळी जाहीर करावीत, अशी ठाम मागणी करण्यात आली.