ठाणे येथे झालेल्या एका कार्यक्रमानंतर भाजप आमदार संजय केळकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. केळकर म्हणाले की, “संजय राऊत जे बोलतात, ते नेमकं उलट घडतं. अशी अनेक उदाहरणं आपण यापूर्वी पाहिली आहेत.” ठाण्यातील विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी “चप्पा चप्पा भाजप” अशी घोषणा असलेले बॅनर लावले होते. यावर काही ठिकाणी विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. या संदर्भात प्रतिक्रिया देताना केळकर म्हणाले की, “ही घोषणा नवी नाही. आमचे कार्यकर्ते उत्साहाने हे बॅनर लावत असतात. ही जुनी घोषणा आहे आणि कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे.”