सध्या पाळीव प्राणी पाळण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. शहरी भागांमध्ये देखील फ्लॅटमध्ये कुत्र आणि मांजर पाळली जातात. सोसायट्यांमध्ये पाळीव कुत्र्यांचा लोकांवर हल्ला करण्याचा प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. पाळीव कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक व्हिडिओ समोर येत आहे. आता पुन्हा एकदा पाळीव कुत्र्याने चालू लिफ्टमध्ये चिमुकल्या मुलीवर हल्ला केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ दिल्लीचा आहे. नोएडा सेक्टर 107 मधील लोटस 300 सोसायटीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याने एका लहान मुलीवर हल्ला केला. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक लहान मुलगी लिफ्टमधून बाहेर पडणार असते तर एक कुत्रं आतमध्ये येतं. हे कुत्रं त्या लहान मुलीवर हल्ला करत तिला चावण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओमध्ये लहान मुलगी एकदम घाबरलेली दिसून येत आहे.
नोएडा मध्ये रहिवाशी इमारतीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याचा चिमुकलीवर हल्ला#Noida #viralvideo #news pic.twitter.com/HEwbUYipsH
— Navarashtra (@navarashtra) May 8, 2024
तळमजल्यावर लिफ्ट आल्यानंतर ती लिफ्ट थांबते. त्यावेळी लहान मुलगी एकदम घाबरलेली आणि भेदरलेली दिसून येते. अश्रू पुसत असताना एक माणूस लिफ्टजवळ येतो आणि कुत्र्याला बाहेर हाकलून देतो. ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, “मुलगी अजून काही वेळ आत असती तर काय झाले असते याचा विचार न केलेला बरा” तर दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, उगाचच बाऊ करु नका. हल्ला झालेला नाही. फक्त मालकाने कुत्र्याला ताब्यात ठेवण्याची गरज आहे.