मुंबई : आता हार्ट अटॅकची चिंता सोडा… पहा नवीन तंत्रज्ञान.. अशाप्रकारची सीटी अँजिओग्राफी की जिच्याद्वारे हार्ट ब्लॉक्स डायरेक्ट काढले जातात… जे. जे. हॉस्पिटल मुंबई येथे उपलब्ध ५००० रू. खर्च विडिओ अवश्य पहा व गरजूंपर्यंत पोहोचवा….अशा स्वरुपाचे संदेश सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral On Social Media) होत आहेत.
मात्र या संदेशाची जे जे रुग्णालय प्रशासनाने (JJ Hospital Administration) दखल घेतली असून अशा खोट्या व्हिडिओ आणि संदेशाची (Fake Video And Message) माहिती समाजमाध्यमांवर पसरवू नये असे आवाहन जे जे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे (Dr. Sanjay Surase) यांनी बुधवारी केले.
दरम्यान या व्हायरल मेसेजमधून केवळ ५ हजार रुपयात हृदयातील ब्लॉक्स जे जे रुग्णालयात काढले जात आहेत. शिवाय ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून केली जात असल्याचा संदेश देखील या व्हिडिओ सोबत प्रसारित केला जात आहे. तसेच तुमच्याकडे जेवढे ग्रुप आणि कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यांना ही बातमी पटकन पाठवा लगेच.
महत्वाची माहिती शेअर करताना आनंद होतो असे आवाहन ही केले जात आहे. मात्र या समाजमाध्यमांवरील प्रसारीत संदेशाबाबत बोलताना जे जे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरासे यांनी हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले. डॉ. सुरासे म्हणाले की, जे जे हॉस्पिटमध्ये अँजीओप्लास्टीची सुविधा उपलब्ध आहे.
[read_also content=”एक ब्युटी क्वीन, एक फसवणारा प्रियकर आणि आरोपीच्या पिंजऱ्यात, जेव्हा मास्टरमाइंड सुकेश जॅकलिनच्या समोर येतो तेव्हा… https://www.navarashtra.com/crime/actress-jacqueline-fernandes-thug-sukesh-chandrasekhar-meeting-silence-dock-court-appearance-hearing-application-allegation-in-patiyala-house-delhi-lawyer-ed-crime-355503.html”]
सदर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेस पात्र असणाऱ्या रुग्णांना सदर उपचार पद्धती ही कॅशलेस पद्धतीने मोफत उपलब्ध आहे. सदरील व्हिडीओ आणि सोबत जोडलेली माहिती ही खोटी असून अशा प्रकारचे व्हिडीओ आणि सोबत जोडलेली माहिती ही खोटी असून अशा प्रकारचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. सदरील खोटे व्हिडीओज आणि माहिती नागरिकांना समाज माध्यमांवर पसरवू नये असे आव्हान जे जे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी केले आहे.