(फोटो सौजन्य: Instagram)
तरुणाने छेडछाड करताच भडकला रोबोट! रागाच्या भरात घेतला असा बदला; VIDEO पाहाल तर तुम्हीही हादराल
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेली ही घटना अमरावती शहरात घडल्याची माहिती आहे. व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, विद्यार्थी त्यांचे लाडके शिक्षक, पवन सुरजुसे यांच्या बदलीचा निषेध करण्यासाठी एकत्र आले होते. त्यांनी शिक्षकांच्या भोवती आणि शाळेच्या प्रवेशद्वारावरही जमून त्यांच्या बदलीला तीव्र विरोध दर्शवला. विद्यार्थ्यांचे अशाप्रकारे एकत्र उभे राहणे हे दर्शवते की, त्यांच्यासाठी ते केवळ पाठ्यपुस्तकातून धडे शिकवणारे शिक्षक नव्हते तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांशी एक घट्ट भावनिक नाते निर्माण केले होते.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये विद्यार्थी फारच भावूक होताना दिसून आले. ही घटना दाखवून देते की, एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात कशी आपली जागा निर्माण करुन जातो. घटनेचा व्हिडिओ @moneycontrol.com नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. अनेक यूजर्सने या घटनेवर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत मांडले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “तुम्ही खूप नशीबवाण आहात सर”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शिक्षकांनी या गुरुजींकडून शिकायला हव, ती मुलं आहेत, त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांना प्रेमाने शिकवा, मुलं आपल्या रंगहीन आयुष्यात रंग भरतात”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “यालाच खरा सुपरहिरो म्हणतात”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






