(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत प्राणीसंग्रहालयातील दृष्ये दिसून येतात. यात दिसते की, वाघांना ठेवलेल्या ठिकाणी एक लहान आकाराचा दरवाजा असतो. यातून कर्मचारी मोठ्या हिमतीने वाघांना अन्न देण्याचे काम करतात. यावेळीही एक कर्मचारी दार उघडून मांसांचा तुकडा आत फेकतो. वाघांच्या दिशेने अन्न टाकल्यानंतर कर्मचारी तिथून पळून जाण्याच्या तयारीत असतो पण एक वाघ त्याच्यावर सरईतपणे हल्ला चढवतो. कर्मचारी पळेल याआधीच तो त्याच्यावर हल्ला करतो आणि पिंजऱ्यात त्याला खेचण्याचा प्रयत्न करु लागतो.
यादरम्यान एक श्वान देखील घटनेस्थळी उपस्थित असतो. मालकावर वाघाने हल्ला केला आहे हे पाहून तो लगेच वाघाच्या दिशेने पळतो आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न करु लागतो. श्वान आणि वाघाची लढत सुरु असताना दुसरा कर्मचारी दरवाजा उघडतो आणि जखमी कर्मचाऱ्याला खेचून पिंजऱ्याच्या बाहेर काढतो, यानंतर ते श्वानालाही आपल्यासोबत पिंजऱ्यातून बाहेर काढतात आणि वाघ त्यांच्या दिशेने धावतील त्याआधीच दरवाजा बंद करतात. व्हिडिओत घडलेली काही सेकंदाची ही घटना कोणत्या थराराहून कमी वाटत नाही. घटना नक्की कोणत्या प्राणीसंग्रहालयात घडली आहे याची अधिकृत माहिती व्हिडिओत देण्यात आली नाही. तथापि, काही यूजर्सने हा व्हिडिओ खरा नसून एआय तंत्रज्ञानाद्वारे व्हिडिओला तयार केल्याचा दावा केला आहे.
View this post on Instagram
या घटनेचा व्हिडिओ @india.uncover नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला सोशल मिडियावर चांगले व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “माझा एआयला सलाम”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणूनच कुत्रे एकनिष्ठ प्राणी म्हणून ओळखले जातात”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “एआयमुळे आपल्या आईला हार्ट अटॅक येईल, कारण त्यांना हे असे व्हिडिओ पाहून सर्व खरं वाटतं”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






