(फोटो सौजन्य: X)
मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral
शाळेत अचानक बेशुद्ध पडली मुलगी
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ सप्टेंबर रोजी दिंडरूड गावात घडून आली. शाळेत पाचवीत शिकणाऱ्या एका ११ वर्षीय विद्यार्थीनीला अचानक फिट आवी आणि ती वर्गातच बेशुद्ध पडली. परिस्थितीच्या गंभीरतेकडे पाहत शिक्षकांनी तिला तात्काळ दिंडरूड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश ढाकणे यांनी मुलीच्या प्रकृतीची तपासणी करून तिला पुढील उपचारांसाठी पाठवले.
रुग्णवाहिका भाड्याने घेण्यावरुन झाला वाद
आरोप आहे की, रुग्णालयाकडून रेफर केल्यानंतर कुटुंबाला रुग्णवाहिकेची सुविधा तर दिली गेली होती परंतु पैशांवरुन रस्त्यातच वाद सुरु झाला होता. मुलीचे वडिल कथितरित्या चालकाने मागितलेले पैसे देण्यास सक्षम नव्हते. याच कारणामुळे मुलीला आणि तिच्या वडिलांना रुग्णवाहिकेतून उतरण्यास सांगितले गेले. या घटनेचा व्हिडिओ एकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मिडियावर घटनेला शेअर केले.
कर्मचाऱ्यांनी थोडीही माणुसकी न दाखवता, आजारी मुलीला असे रुग्णवाहिकेतून बाहेर काढल्याने नेटकरी चांगलेच नाराज झाले आहेत. अनेक यूजर्सने व्हायरल व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “शेवटी त्याने बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेतलं आणि मागोमाग हतबल आजी चालत निघाली. मोफत १०८ रुग्णवाहिका का बोलावली नाही? “रुग्णवाहिका फक्त गर्भवतींसाठी” हा नियम नेमका कुणासाठी आहे? ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा’चा गाजावाजा होत असताना एक गरीब मुलीचा जीव डिझेलच्या पैशांत का अडकला?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पैसे घेतल्याशिवाय काम होत नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मुलीच्या जीवाहून जास्त प्यारा पैसा झाला त्यांना”.
शाळेत फिट येऊन बेशुद्ध पडलेल्या ११ वर्षांच्या मुलीला पुढच्या उपचारांसाठी नेण्याची वेळ आली. पण बीड जिल्ह्यातील दिंद्रूड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने तिच्या कुटुंबाकडे आधी डिझेलचे पैसे मागितल्याचा आरोप आहे. आई नसलेल्या, हमाली करणाऱ्या बापाकडे पैसे नव्हते. https://t.co/tysedVDv2h — Praveen Gavit (@praveengavit11) October 14, 2026
आईचे झाले निधन
सांगितले जात आहे की, मुलीच्या आईचे आधीच निधन झाले आहे. कुटुंब आर्थिक परिस्थितीशी झुंजत असून वडिल मजूराचे काम करत आहेत. त्यांना एकूण चार मुले आहेत. अशा वाईट परिस्थितीत मुलीवर दया न दाखवता फक्त काही पैशांसाठी तिला आणि तिच्या वडिलांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढणे ही घटना मनाला सुन्न करुन जाते.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






