(फोटो सौजन्य: X)
मोबाईल हिसकावून फरार होण्याचा प्रयत्न
व्हायरल व्हिडिओ हा बिहार राज्यातील शिवनारायणपुर रेल्वे स्थानकाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. एक व्यक्ती चालू रेल्वेतून प्रवाशाचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करत होता. तथापि, त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि प्रवाशांनी त्याला रंगेहात पकडले. प्रवासी इतके भडकले होते की सहजासहजी चोराला सोडण्यापेक्षा त्यांनी चोराल शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.
प्रवाशांनी खिडकीतूनच चोराचे दोन्ही हात पकडून ठेवले. यावेळी चोर रेल्वेबाहेर खिडकीत हात घालून लटकला होता. मुख्य म्हणजे काही वेळाने रेल्वे सुरु होते पण तरीही प्रवासी काही चोराचा हात सोडायला तयार असतात. यावेळी तो आपल्या प्राणासाठी ओरडताना, प्रवाशांना विनवणी करताना दिसला. प्रवासी रेल्वेचा वेग वाढल्यानंतर चोराचा हात सोडतात ज्यामुळे तो रेल्वे स्थानकावर जाऊन आदळतो. शेवटच्या दृष्यात चोर स्थानकावर पडल्याचे दिसते. सुदैवाने, तो धावत्या ट्रेनच्या चाकांखाली चिरडला गेला नाही, अन्यथा त्याचा जीव गेला असता.
Shocking: A thief tried to snatch a passenger’s phone from a moving train at Shivnarayanpur Railway Station, but got caught and was held through the window. 😳 https://t.co/MueMxLrT6j — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 14, 2026
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @RajuSharmajour1 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर यूजर्सने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून काहींनी चोराची बाजू घेतली आहे तर काहींनी प्रवाशांचे वागणे योग्य आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात एका यूजरने म्हटले की, “हे बरोबर नाही. चोरीवरून कोणालाही एखाद्या माणसाची हत्या करण्याचा अधिकार नाही. राग येणे स्वाभाविक आहे आणि रागाच्या भरात थोडी मारहाण होऊ शकते, पण हे खूपच जास्त होत आहे. तो ट्रेनच्या चाकांमध्ये अडकून गंभीर जखमी होऊ शकतो किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज कर्माने एक्सप्रेसचा वेग पकडला आहे..”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “खुनी चोरापेक्षा चोर कमी गुन्हेगार असतो”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






