क्षणात खेळ खल्लास! बाईकवरुन उतरला, भरधाव बससमोर गेला अन्...; पुढच्या क्षणी जे घडलं...; थरारक Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भरदिवसा भंयकर प्रकार! आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…; तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण, संतापजनक VIDEO VIRAL
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक गजबलेला रस्ता दिसतोय. गाड्यांच्या मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु आहे. तेवढ्यात एक तरुण बाईकवरुन उतरतो आणि तसाच धावत बस थांबवायला जातो. यावेळी त्या तरुणासोबत असलेला दुसरा तरुण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. दोघांमध्ये कोणत्या तरी कारणांवरुन भांडणे झाली असल्याचा त्यांच्या वागण्यावरुन अंदाज व्यक्त केला जात आहे. तुम्ही पाहू शकता की पहिली तरुण रस्ता ओलांडून दुसरीकडे जोत. त्याचा मित्र त्याला ओरडून थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, त्याला थांबवण्याच्या नादात समोर बस येते आणि मित्र तरुणाचा भयंकर अपघात होतो. बसचा वेग इतका असतो की चालकाला ब्रेक दाबण्याचीही संधी मिळाली नसेल.
व्हायरल व्हिडिओ
इसे कहते हैं मौत को गले लगाना। बाईक से अचानक उतर कर युवा बीच व्यस्त सड़क पर न जाने क्यों ही उतरा। pic.twitter.com/XHWUhTk7ar — Sunil Sharma (@SunilSharmaInc_) May 30, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SunilSharmaInc_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हे दृश्य पाहून आसपासचे लोकांच्या आणि नेटकऱ्यांचाही थरकाप उडाला आहे. ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली हे अद्याप स्पष्ट नाही. तसेच पुढे काय घडलं याबाबतही कोणती माहिती समोर आलेली नाही. परंतु हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांच्या मते, तरुण बस थांबवण्याचा प्रयत्न करत होता, तर कोणी या मूर्खपणा म्हटले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






