सोशल मीडियावर (social media) रोज अनेक व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. कधी कधी पक्षी प्राण्यांसोबत लहान मुलांचे खेळतानाचे व्हिडिओ समोर येतात. पण तुम्ही कधी महाकाय अजगरसोबपत चिमुकल्याला खेळताना पाहिलं आहे का? नुसतं विचार तरी केली तरी भितीनं घाबरगुंडी उडते. मात्र, असं प्रत्यक्षात घडलं आहे. एका चिमुकल्याच अजगर सोबत खेळतानाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो अगदी कुत्र्यांमाजरांप्रमाणे त्याच्याची बिनधास्त खेळताना (Child Playing With Python) दिसत आहे.
[read_also content=”लखनऊची ‘रॉकेट वुमन करणार चांद्रयान मिशनचं नेतृत्व’, जाणून घ्या कोण आहे रितू, जिच्यावर आहे मोठी जबाबदारी! https://www.navarashtra.com/india/lucknowsrocket-woman-ritu-karidhal-srivastava-will-lead-chandrayaan-3-mission-nrps-431597.html”]
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक चिमुकला महाकाय अजगरासोबत खेळताना दिसत आहे. तो त्याच्यावर स्वार होता. त्याच्या अंगावर बसून खेळतोय. एवढ्यात अजगर समोर गेल्यावर तो ही उठतो आणि त्याला उचललो. पण एवढ्यात मुलाचे मन भरले नाही. तो उठतो आणि त्याचा जबडा उघडताना दिसला. त्या मुलाला अजगराशी खेळताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं.
[read_also content=”आता बिनधास्त जा आयफेल टॉवर पाहायला! भारतीय फ्रान्समध्ये UPI द्वारे पेमेंट करू शकणार, भारत फ्रान्समध्ये झाला करार https://www.navarashtra.com/india/india-signs-deal-in-france-on-indians-can-make-payments-through-upi-in-france-nrps-431575.html”]
असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर टिका केली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचा मोठा अजगर दिसत होता. अजगराची हा मोठ्या व्यक्तिलासुद्धा सहज गिळू शकतो. पण त्याच्याशी खेळणाऱ्या मुलालाही त्याने इजा केली नाही. मुलगा अजगराच्या वर बसलेला दिसला. अजगर पुढे सरकत होता आणि त्यासोबत लहान मूलही स्वार होत होते. काही वेळाने मुलगा उठला आणि अजगराच्या तोंडाजवळ गेला. मुलाने हाताने तोंड वर करून सापाचा जबडा उघडला. पण अजगराने काहीच केले नाही.