(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
रशियातील रोस्तोव-ऑन-डॉनचा रहिवासी असलेला येवगेनी एक प्रसिद्ध स्टंटमॅन आहे. त्याच्या धोकादायक आणि जीवघेण्या स्टंट्ससाठी तो सोशल मिडियावर प्रसिद्ध आहे. येवगेनीने यावेळी काहीतरी वेगळं आणि धाडसी करण्याचा निर्धार घेतला ज्यासाठी त्याने हेलिकाॅरप्टरच्या पंख्याची मदत घेतली. व्हिडिओमध्ये तो क्रेनला लटकून खाली उभ्या असलेल्या फिरत्या हेलिकाॅप्टरच्या पंख्यावर पाय ठेवताना दिसतो. आपली एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते हे लक्षात घेऊन येवगेनी लक्षपूर्वक हळूहळू खाली येतो आणि आपला पाय हेलिकाॅप्टरच्या चाकांमध्ये असलेल्या जागेवर स्पर्श करतो. यानंतर क्षणांचाही विलंब न करता तो पुन्हा आपले पाय वर घेतो आणि हवेत लटकतो. त्याचा हा स्टंट सध्या चांगलाच चर्चेत असून यूजर्स त्याच्या धाडसाचे मनभरुन काैतुक करत आहेत. एका स्टंटसाठी आपला जीव असा धोक्यात घालणे चुकीचे आहे असेही काहींचे मत आहे.
View this post on Instagram
दरम्यान घटनेचा व्हिडिओ @chebotarev_evgeny नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून अनेक यूजर्सने येवगेनीच्या धोकादायक स्टंटवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अरे मित्रा, तू एकदा भारतात तर जाऊन बघ, तिथे लोक तुला देवच मानतील—बापरे!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यालाच म्हणता उडता बाण अंगावर घेणे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पण जीव धोक्यात घालून हा स्टंट करणं खरंच गरजेच होत का?”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






