पठ्ठ्यानं कारला 'असं' मॉडिफाय केलं की भले भले इंजिनियरही होतील फेल; गुजरातच्या या कारची होतेय जोरदार चर्चा, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक कार रस्त्यावरुन धावत आहे. बाहेरुन ही कार एका खोलीसारखी वाटत आहे. या कारला उंच काचा लावण्यात आल्या आहेत. आतमध्ये तीन-चार प्रवासी बसले आहेत. तेली जमीनीवर मांडी घालून आरामात बसल्यासारखे, जसे आपण घरी बसतो. ड्रायव्हरची सीटीही उंचावर आहे. गाडीला मागच्या बाजूने दरवाजा आहे. गाडीची नंबर प्लेटवरुन लक्षात येते की ही गुजरातची कार आहे.
Viral News : …अन् फुकटात चहा प्या, गॅस टंचाईवर पुणेरी जुगाड; पाटी वाचून पोट धरुन हसाल
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @deepakvalia या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका म्हटले आहे की, याला कारच लायसन्स चालतंय की ट्रकचं , दुसऱ्याने प्रवासाचे बजेट १० हजार आणि चालानचे ५० हजार असे म्हटले आहे. तर एका छताचा पंखा कुठे असे म्हटले आगे. सध्या ही कार सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. हे एक चालतं फिरतं घरच भासत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






