केज: गावागावात प्रवासासाठी एसटी महामंडळची बससेवा महत्त्वाची भूमिका बजावते. गावातील वाहतूक ही एसटीवर अंबलवून आहे. अनेक शालेय व कॉलेजचे विद्यार्थी एसटी बसमधून रोजचा प्रवास करतात. त्यामुळे नेहमी एसटी बस तुडूंब भरलेल्या असतात. त्यात महिलांना अर्धे तिकीट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग देखील बसप्रवास करतो. या गर्दीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. मात्र जागेसाठी अनेकजण शॉर्टकटने बसमध्ये चढतात.काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक विद्यार्थी बसच्या खिडखीतून चढत असताना खिडकीसकट खाली पडला.
सध्या सोशल मीडियावर एसटी महामंडळाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बसस्थानकावर एक बस आल्यानंतर त्यामागे प्रवाशांची झुंबड उडालेली असते. उभे राहून देखील अनेक प्रवासी प्रवास करतात. उभे राहायला लागू नये म्हणून एका व्यक्तीने अनोखा जुगाड केला आहे. सोशल मीडियावर त्या व्यक्तीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओत एका व्यक्तीने बसची खिडकी काढून आजीच्या हातात दिली आहे. आणि तो बसमध्ये चढत आहे. केज बसस्थानकावरिल हो व्हिडीओ आहे. यामध्ये जागा मिळवण्यासाठी वापरलेला शॉर्टकट या व्यक्तीला देखील महागात पडला आहे.
व्हायरल व्हिडीओ
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती बसमध्ये चढण्यासाठी गर्दी असल्याने खिडकीतून चढत आहे. बसची खिडकी एका आजीने हातात घेतली आहे. त्या व्यक्तीने आधी आतमध्ये सामान ठेवले. तितक्यात तो आतमध्ये चढत आसताना त्या ठिकाणी बस ड्रायवर येतो. आणि त्याला खाली उतरायला सांगतो. पण त्या व्यक्तीला लवकर उतरता येत नाही. तो तिथे अडकतो. बस ड्रायवर त्याला एसटी स्टॉडच्या केबिनमध्ये जायला लागतो. तो त्याला फाईन द्यायला लावतो. खिडकी घेऊन उभी असलेली आजी त्याला खिडकी बसवून येईल असे सांगते. तो व्यक्तीही तसेच बोलतो. पण बस ड्रायवर काही ऐकत नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
‘केजकर सुधरा जरा’
हा व्हिडीओ babamandhare32532 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाइक केले आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हणले आहे की, ‘केज कर सुधरा जरा’ तर दुसऱ्याने म्हणले आहे की, ‘फुकट पाहिजे असं होणारच’, तर आणखी एकाने लिहले की, ‘एसटी महामंडळाने आता नवीन बसेस आणाव्यात’