एक कॉल आणि तरुण मृत्यूच्या विळख्यात
भररस्त्यात चालताना स्वतःची विशेष काळजी घ्यावी आणि फोनचा वापर करू नये असे वारंवार सांगितले जाते. कारण याच मोबाइलमुळे आजवर अनेक अपघात झाले आहेत. रस्त्यावर मोबाइलचा वापर करणे फार धोकादायक ठरू शकते, यामुळे अपघाताचा धोका वाढतो. आजवर अशाच निष्काळजीपणामुळे अनेक व्यक्तींचा विनाकारण जीव धोक्यात पडला आहे. अशाच प्रकारे मोबाइलवर बोलता बोलता रस्ता ओलांडणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ आत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क होत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
हैदराबादमध्ये रविवारी एका महामार्गावर एका व्यक्तीचा भीषण अपघात घडून आला. यावेळी घडले असे की, एक व्यक्ती फोनवर बोलत भररस्त्यातून चालत होता यावेळी अचानक एक वेगवान गाडी आली आणि या गाडीची व्यक्तीला जिरदार धडक बसली. कारचा वेग जास्त असल्याने चालकाला काय करावे ते सुचले नाही हा अपघात घडून आला. विशेष म्हणजे, या व्यक्तीची आणि कारची इतकी जोरदार धडक झाली की धडकेनंतर व्यक्ती थेट काही अंतर हवेत उडाला आणि मग जोरात जानिमिनार जाऊन कोसळला. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारा येईल.
या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव बोड्डू गिरी बाबू असे आहे. तो अन्नोजीगुडा भागातील आरजीके कॉलनी येथील रहिवासी होता. ही व्यक्ती हैदराबादमधील एनटीपीसी एक्स रोडजवळ मोबाइलवर बोलत रस्ता ओलांडत होता आणि याचवेळी ही दुर्घटना घडून आली. त्यांनतर आता ही हृदयद्रावक घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A car fatally struck a man crossing the road near Annojiguda, Medchal district, on the Hyderabad-Warangal road early Monday morning. The victim was reportedly absorbed in a phone conversation at the time.#accident #Annojiguda #Hyderabad #Warangal pic.twitter.com/sXmcMF3I1r
— Sonia Dham (@SoniaDham) July 15, 2024
यानंतर हैदराबाद पोलिसांनी आरोपीविरुद्ध निष्काळीजीपणे गाडी चालवण्याचा गुन्हा दाखल केला असून आता पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. या अपघातानंतर आता रस्ते सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. अनेकजण रास्ता नियमांचे पालन करत नाहीत आणि मग अपघाताच्या विळख्यात जाऊन अडकतात आणि स्वतःचा जीव गमावून बसतात. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @Sonia Dham नावाच्या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये व्यक्त केल्या आहेत.