मगरीसोबतचा खेळ तरुणाला महागात पडला
जगातील भयंकर प्राण्यांमध्ये मगरीच्या समावेश दिसतो. मगर आपल्या शिकारासाठी विशेष करून ओळखली जाते. अतिशय शांतपणे आपल्या शिकारीची वाट बघत ती निशाणा साधत आपल्या शिकारावर धाव घेते आणि क्षणार्धात त्याचा खातमा करते. पाण्यातील धोकादायक प्राण्यांपैकी मगर एक आहे. मोठमोठे प्राणी तिच्या हल्ल्यापासून वाचत नाहीत. तिची भीती जगभर प्रसिद्ध आहे. माणसे तर मगरीच्या जावळही जायला बघत नाहीत. त्यातच आता सोशल मीडियावर मगरीच्या एक भयावह व्हिडिओ फार व्हायरल होत आहे.
अनेकदा काही लोक अतिशहाणपणा करायला जातात आणि तोंडावर पडतात. त्यांनी केलेला शहाणपणा त्यांच्याच अंगाशी येतो. काही प्राणी इतके धोकादायक असतात हे माहित असतानाही काही लोक त्यांच्याशी विनाकारण मस्ती करायला जातात आणि स्वतःच यात अडकतात. सध्या याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एक व्यक्ती मागारीशी मस्ती करताना दिसत आहे मात्र ही मस्ती त्याच्या चांगल्याच अंगलड आली आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. नक्की प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घ्या.
हेदेखील वाचा – मित्रांसोबत मस्करी करणं महिलेच्या जीवावर बेतलं, थरकाप उडवणारा मृत्यूचा थरार सीसीटीव्हीत कैद, Video Viral
व्हायरल व्हिडिओमध्ये नीट पाहिले तर दिसते की, एक व्यक्ती स्टंट करण्यासाठी चक्क मगरीच्या जबड्यात आपले डोके ठेवून दाखवत आहे. मात्र काहीवेळातच त्याची ही हुशारी त्याला चांगलीच महागात पडते. पुढच्याच क्षणी मगर आपले तोंड बंद करते आणि व्यक्तीचे तोंड मगरीच्या जबड्यात अडकते. यांनतर व्यक्ती वेदनेने ओरडू लागतो. हे पाहून त्याला त्याचे मित्र त्याला वाचवण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतात आणि जबरदस्तीने मगरीचे तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र मगर काय आपला जबडा उघडत नाही. ती आपल्या जबड्यात व्यक्तीला धरून राहते. हे संपूर्ण दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो.
Overconfidence 💀 pic.twitter.com/wMCUidvs0f
— Second before disaster (@NeverteIImeodd) July 18, 2024
या सर्व घटनेनंतर त्या व्यक्तीचे नक्की काय झाले याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर फार वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @NeverteIImeodd नावाच्या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, अतिआत्मविश्वास असे लिहिले आहे. या व्हिडिओला 6 दशलक्षाहुन अधिक लोकांनी पाहिले आहे तर 27 हजार लोकांनी याला लाइक्स दिले आहेत. व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत आणि कमेंट्समध्ये त्या व्यक्तीच्या स्थितीबद्दल आणि तो अद्याप जिवंत आहे की नाही याबद्दल प्रश्न विचारत आहेत.