देवासारखे धावून आले! बैलाने महिलेवर हल्ला चढवताच काकांनी केलं असं... थरारक लढतीचा Video Viral
बैल हा तास शांत प्रवूतीचा प्राणी आहे मात्र एकदा का त्याला राग आला तर मग समोरच्याच काही खरं नाही. पिसाळलेल्या बैलाच्या वाटेल कधीही जाऊ नये. बैल आपल्या शिंगासाठी ओळखली जाते. ही शिंगे काही साधीसुधी नाही. बैल रागात आली की नेहमी या शिंगानी समोरच्यावर वार करते. हा वार समोरच्याला चांगलाच महागात पडू शकतो. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका पिसाळलेल्या बैलाने अचानक एका महिलेवर वार केल्याचे दिसून येत आहे. मात्र तितक्यात एक काका देवप्रमाणे तिथे एंट्री घेतात आणि या बैलाला चांगलीच झुंझ देतात. बैल आणि काकांच्या या लढतीचा व्हिडिओ पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत. त्यांच्या लढतीचा हा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. लोक त्यांच्या धाडसाचे फार कौतुक करत आहेत.
हेदेखील वाचा – बेंगळुरूच्या KGF मध्ये अवघ्या 5 सेकंदात दुमजली इमरतीचा झाला चुराडा, धडकी भरवणारा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओत एक महिला रस्त्याने चालताना दिसते तितक्यात समोरून एक बैल येतो आणि महिलेवर हल्ला करतो. यावेळी हा बैल महिलेला आपल्या शिंगांनी अडवताना आणि प्रहार करताना दिसतो. जो महिलेला अक्षरशः जमिनीवर कोसळतो, महिला फार प्रयत्न करते मात्र तिला यातून आपली सुटका करता येत नाही. दरम्यान आजूबाजूची काही लोक तिथे येतात आणि बैलाला रोखण्याचा प्रयत्न करतात मात्र बैल काही ऐकायला तयार नसतो. शेवटी या युद्धात काकांची एंट्री होते, ते बैंलची शिंगे पकडून त्याला रोखून ठेवतात आणि महिलेची त्याच्या तावडीतून सुटका करतात. संधी मिळताच काका आणि इतर लोकही तिथून पळून जातात. व्हिडिओच्या शेवटी एक व्यक्ती बैलाला काठीचा धाक दाखवत तेथून पळवून लावताना दिसून येते.
हेदेखील वाचा – नातवाच्या अंत्यसंस्कारावेळी पार्थिवासमोर जाऊन नाचू लागले आजोबा, पाहून तुम्हालाही बसेल धक्का, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @laughtercolours नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हाच आहे खरा माणूस ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शूर माणसाबद्दल आदर ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बाहुबली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.