(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
कोटा येथून आलेल्या जनशताब्दी एक्सप्रेसमधून उतरणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या हातातून एका खोडकर माकडाने पैशांची पर्स पळवली. या पर्समध्ये जवळपास ४०,००० रुपयांची रोकड होती. पर्स घेऊन माकड पादचारी पुलाच्या पत्र्याच्या शेडवर बसला. इथे बसून त्याने पर्समध्ये कोणती खाण्याची वस्तू आहे का ते पाहण्यासाठी पर्स ओपन केली. पण त्याच्या प्लॅनिंगचा इथे हिरमोळ झाला. पाकिटाच्या आत खाऊ असेल असा विचार करुन माकडाने पर्स चोरली खरी पण यात त्याला पैसे आढळून आले. मग काय, खाऊची वस्तू मिळाली नाही म्हणून माकडाने थेट ५००, २०० नोटांनी भरलेले पाकिटातील सर्व पैसे रेल्वे स्थानकावर उधळायला सुरुवात केली. हवेत पशांचा होणारा पाऊस पाहून अनेर प्रवासी थक्क झाले तर काहींनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले.
माकडाने पैसे उधळल्यानंतर तिथे उपस्थित प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी हवेत उडत असलेल्या या पैशांच्या नोटा गोळा करण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच पैशांच्या नोटा गोळा करण्यात आल्या आणि प्रामाणिकपणामुळे महिलेला हे पैसे परत करण्यात आले. पाकिटातील ४०,००० रुपयांपैकी ३९,००० रुपये महिलेला परत मिळाले उर्वरित १००० रुपये मात्र हाती लागले नाही. महिलेने सर्व प्रवाशांचे आणि रेल्वे पोलिसांचे त्यांच्या मदतीबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
कोटा रेल मंडल के श्री महावीर जी स्टेशन पर एक बंदर जनशताब्दी एक्सप्रेस से उतरी महिला यात्री कैलाशी कोड़िया का पर्स छीनकर फुटओवर ब्रिज पर चढ़ गया. खाने का सामान समझकर बंदर ने पर्स में रखे ₹40,000 हवा में उड़ा दिए. pic.twitter.com/BrGE0RgXeh — Vicky Pratyax Singh Rathore (@VickyPratyax25) September 3, 2026
देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral
ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून @expos.enow नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून यूजर्सने यातील दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “मै बारीश कर दू नोटों की जो तू मिल जाए… या गाण्याचा माकड फॅन असावा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कदाचित काळं धण असेल म्हणून बजरंग बलीने लुटून घेतलं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हा माकड त्याच्या मागील जन्मात एसबीआयमध्ये कॅशियर होता का?”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






