मुंबईच्या गोरेगावमधील अनमोल टॉवरमध्ये हायड्रोजन फुगा फुटल्याने लिफ्टमध्ये भीषण आग लागली. या अपघातात ३ जण भाजले असून थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
Mumbai News:मुंबईच्या गोरेगाव (पश्चिम) परिसरातून एक अंगावर शहारे आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निवासी इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसने भरलेला फुगा फुटल्याने भीषण आग लागली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, लिफ्टमध्ये असलेले दोन तरुण आणि एक तरुणी आगीच्या ज्वाळांमध्ये जखमी झाले. ही संपूर्ण घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.