मुंबई लोकलमध्ये नेमकं काय घडलं? भरगच्च रेल्वेत दोन जण भिडले, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल झालेल्या या व्हिडिओत चालू लोकलच्या आतमधील काही दृष्ये दिसून येतात. रेल्वे प्रवाशांनी भरगच्च भरलेली असते आणि यातच दोन प्रवासी एकमेकांवर हल्ला चढवत असतात. शाब्दिक बाचाबाचीतून नेहमीच प्रवाशांमध्ये वाद सुरु असतात तर कधी हे वाद हाणामारीपर्यंत पोहचतात. व्हिडिओतही काही असेच घडताना दिसून आले. गर्दीचा विचार न करता जनरल डब्यातील दोन पुरुष एकमेकांना मारायला धावतात तर या सर्व राड्यामुळे इतर प्रवासी त्रस्त झाल्याचे दिसतात. बऱ्याच वेळानंतरही जेव्हा हा वाद मिटत नाही तेव्हा एक माणूस मध्यस्ती बनून त्यांना वेगळे करतो आणि भीषण हाणामारी थांबते. तिथे उपस्थित काही प्रवशांनी घटनेचा व्हिडिओ आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला असून व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच ट्रेंड करत आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, कोणत्या लोकलचा किंवा कोणत्या रेल्वे स्थानकाच्या परिसरातील आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रेल्वे प्रशासन किंवा रेल्वे पोलिसांकडूनही या विशिष्ट व्हिडिओबाबत अधिकृत स्पष्टीकरण अथवा घटनेची पुष्टी सध्या झालेली नाही. त्यामुळे व्हिडिओच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.
View this post on Instagram
मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमधील किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत होण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची तारीख, ठिकाण आणि पार्श्वभूमी यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.






