Badlapur to Goregaon: दिवसाBadlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
कारण त्याच ठिकाणी सामान्य व्यक्तींला परवडणारे घर मिळते. मात्र कामांसाठी दररोज प्रवास करावा लागतो. रोजचा 3-4 तास प्रवास करुन कामावर यावे लागते. अशी एक व्यस्था मांडणारी पोस्ट सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. Badlapur to Goregaon:
मी दररोज बदलापूर ते गोरेगाव असा ६ तासांचा प्रवास करतो. या प्रवासामुळे मी खूप थकलो आहे. मी सकाळी ५ वाजता उठतो आणि साधारण ६:३० वाजता घराबाहेर पडतो. ७:१५ वाजता बदलापूर स्टेशनवरून लोकल ट्रेन पकडतो, दादरला पोहोचून वेस्टर्न लाईनची ट्रेन घेतो, गोरेगाव स्टेशनला उतरतो आणि तिथून शेअर रिक्षाच्या रांगेत दररोज ३० मिनिटे उभे राहून शेवटी ऑफिसला पोहोचतो.
मी साधारण १० वाजता ऑफिसला पोहोचतो. संध्याकाळी ७ वाजता ऑफिसमधून निघतो आणि रात्री ११ वाजेपर्यंत बदलापूरला घरी परततो. हे माझे रोजचे वेळापत्रक आहे; फक्त रविवारी मला सुट्टी असते.

मी ऑफिसजवळ ‘पीजी’ (PG) शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील बहुतेक खूप महाग आहेत आणि स्वस्त पर्याय खूप अस्वच्छ आहेत. माझा पगार महिन्याला फक्त ३५,००० रुपये असल्याने तिथे राहण्यासाठी घर भाड्याने घेणे मला परवडणारे नाही. विचार करा, दररोज प्रवासात ६ तास घालवणे कसे असते! मी घरी फक्त रात्री झोपण्यासाठीच येतो.
एक नेटकरी लिहितो की, तू दुसरा जॉब बघ, तर दुसरा नेटकरी म्हणतो की,मी पण दररोज 3 तास प्रवास करतो आहे. मला ही खूप दमायला होते.
![]()
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






