पांचट Jokes : श्रावणाच्या सभेत सर्व देवतांची मिटिंग झाली आणि मग एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला; वाचाल तर हसतच राहाल
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! श्रावण महिना सुरु होणार आहे अशात सर्वांनी पोटाची अन् मनाची तयारी करून ठेवली आहे. नॉनव्हेज नाही तर निराश होऊ नका, हे श्रावण स्पेशल जोक्स वाचा, मित्रांना शेअर करा आणि खळखळून हसा.
कोंबडा कोंबडीला म्हणाला
अगं ऐकतेस का…
श्रावण महिना सुरु आहे तर तेवढ्यात आपला एक फॅमिली फोटो काढून घेऊयात…
श्रावण स्पेशल कविता
श्रावण मासी, हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
कोंबडी, मच्छी बंद जाहली
आता फक्त साबुदाण्याचे वडे…
एक शंका होती…
श्रावणात वाघ बकरी चहा चालतो का?
( सहज आपली एक शंका होती )
श्रावण सुरु झाल्यापासून कोंबड्यांना भय राहील नाही
तोंडासमोरून ऐटीत चालत जातात…
आधी आई बोलायची श्रावण बाळ
आता म्हणते : बाळा आता श्रावण तरी पाळ…
चित्ता हरणाला : अरे पळ इकडून मी श्रावण पाळला आहे
हरीण : धन्यवाद भाऊ…
कोंबड्याने कोंबडीसाठी तयार केली शायरी
म्हणाला : कोंबडा म्हणाला कोंबडीला… जिस दिन का था इंतेजार वो दिन आया है…
कोंबडा म्हणाला कोंबडीला… जिस दिन का था इंतेजार वो दिन आया है…
मोहब्बत बरसा देना तू … श्रावण है आया
श्रावणाच्या सभेत सर्व देवतांची मिटिंग झाली
या मीटिंगमध्ये सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला की..
ज्यांचा टूथपेस्टमध्ये नमक असेल त्यांचे व्रत मान्य केले जाणार नाही…
रिंकी : तुमचा मुलगा पवन आजकाल खूप शांत आहे.
पवनची आई : काही दिवस थांबा, तो पुन्हा आवाज करेल
रिंकी : ते कसं?
पवनची आई : श्रावण महिना येत आहे…
रिंकी : मग?
पवनची आई : सावन का महीना, पवन करे शोर
श्रावण महिन्यात असा उपवास करून दाखवा
सोमवारी मोबाईल बंद
मंगलवारी इंस्टाग्राम बंद
बुधवारी लाईट बंद
गुरुवारी इंटरनेट बंद
शुक्रवारी कार, मोटारसायकल बंद
शनिवारी व्हॉट्सॲप बंद
रविवारी टीव्ही बंद
असे उपवास कराल तर…
खुद्द देव पृथवीवर येऊन म्हणेल बस कर वेड्या, आता रडवशील काय?
Web Title: Panchat jokes a meeting of all the gods was held in the shravan sabha and important decision was made read marathi shravan special jokes and laugh out loud