Marathi Jokes : अरे, जरा हस की भावा! आजी नातवाचं नातं अन् त्यातील मिश्किल संभाषण नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढत आजीचे हे मराठी विनोद नक्की वाचा आणि हास्याचा गटात सामील व्हा.
पप्पू त्याच्या आजारी आजीला शेजारच्या डॉक्टरकडे घेऊन गेला
डॉक्टर : तोंड उघड, आजी
आजी : तुझी बायको रोज संध्याकाळी तुझ्या शेजारी राजूला भेटायला येते, आता अजून माझं तोंड उघडायला लावू नकोस…
आजी : मुली, तू थोडं स्वयंपाक करायला शिकले पाहिजे… मुलींना स्वयंपाक यायला हवा
नात : पण का, आजी? फक्त मुलगीच का?
आजी : अरे.. जर नवरा घरी नसेल तर तू रिकाम्या पोटी झोपणार का?
एक आजी रस्त्यावर पडली, म्हणून एका मुलाने तिला उचलले…
आजी : बेटा, तू मला उचललेस, देव तुला उचलेल…
मुलगा तिथेच बेशुद्ध…
नातू : आजी, मी फास्ट रनिंग रेसमध्ये भाग घेणार आहे, कृपया मला आशीर्वाद दे..
आजी : आरामात धाव बेटा, जास्त घाई करू नको…
आजीला गीतेचे पठण करताना पाहून नातवाने आईला विचारले…
नातू : आई, आजी कोणत्या परीक्षेची तयारी करत आहे
आई : बेटा, आजी फायनल ईयरची तयारी करत आहे…
आजी नातवाला म्हणाली : जा लवकर माझे दात घेऊन ये
नातू : अजून भाकरीही बनवल्या नाहीत, तू दातांचे काय करणार?
आजी : भाकरी मरूदे, इथे बाजूचे आजोबा मला स्माईल देत आहेत, मला त्यांना कातिलाना स्माईल द्यायची आहे..
आजी (नातवाला) : तुझ्या शाळेतील शिक्षक येत आहेत, पळ लप जा…
नातू : आजी, तू पण लप जा, मी तुझ्या मृत्यूचे कारण सांगून २ आठवड्यांची सुट्टी घेतली आहे…
आजी : बाळा कसा आहेस?
नातू : ठीक आहे
आजी : अभ्यास कसा चालू आहे?
नातू : एकदम तुझ्यासारखी…
आजी : म्हणजे?
नातू : देवाच्या भरोवश्यावर आहे…
आजी मुलाकडे राहायला गेली तेव्हा सुनबाई नातवाला मारत होती
आजी : सुनबाई, का त्या पोराला मारत आहेस?
सुनबाई : बघा ना, आई हा नुसता कोलगेट खातोय
आजी : मुला असा नुसता कोलगेट खायचा नसतो, चपातीसोबत खा
नातं : काय ग आजी, आमच्या वेळेला असं होत तसं होत असं सारखं बोलत असतेस..
आजी : हो मग आमच्या वेळेला आरसे पण किती छान होते! कोणत्याही आरशात पहिले, तरी मी खूप सुंदर दिसायचे,
नाही तर आता तुमच्या काळातले आरसे? कोणत्याही आरशात पहिले तरी मी म्हातारीच दिसते.
Web Title: Panchat jokes grandmother funny marathi jokes will creates laughter read it and laugh out loud