पारले जी ची नवीन जाहिरात शिक्षक विद्यार्थ्यांना समर्पित
भारतात तुम्हाला शोधून कोणी असा सापडणार नाही ज्याने पारले जी बिस्कीट खाल्ले नसेल. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच आयुष्यात एकदातरी पारले जी बिस्कीट नक्कीच खाल्ले असेल. हे बिस्कीट आपल्या देशांतील सर्वात फेमस बिस्कीटांपैकी एक आहे. या बिसेकीटाला लोकांकडून भरभरून प्रेम मिळाले आणि ते प्रेम नाते आजही कायम आहे. या बिस्कीटच्या अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्या असतील. अनेकदा या जहािराती खूप इमोशनल करतात. सध्या पारले कंपनीने एक नवीन जाहिरात बनवली आहे. ज्यातून एक महत्त्वपुर्ण संदेश कंपनीने दिला आहे.
ही जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही जाहिरात शिक्षक-आणि विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देणारी आहे. ही जाहिरात पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेची, मास्तरांची आठवण येईल. आठवणींना पुन्हा एकदा जागे करण्यासाठी ही ॲड नक्की पाहा. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर या ॲडने अनेकांना भावनिक बनवले आहे. या ॲडला लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.
हे देखील वाचा – ‘मेरा जुता है जपानी’ गाण्यावर आजीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल
ॲडमध्ये काय आहे?
या ॲडमध्ये एका शाळेच्या महिला मुख्याध्यापकाची कथा दाखवण्यात आली आहे. शिक्षिकेला त्यांच्या पहिल्या बॅचची आठवण येत असल्याचे यात दाखवण्यात आले आहे. आपल्या पहिल्या बॅचच्या आठवणी त्यांनी ‘बागेच्या’ रूपात जपल्या आहेत. खरं तर, कथा अशी आहे की जेव्हा शिक्षकांनी शिकवलेली पहिली बॅच उत्तीर्ण झाली तेव्हा सर्व मुलांनी तिला प्रत्येकी एक रोप भेट दिले. ही 1995 ची बॅच होती. आता त्या 2025 च्या बॅचच्या मुलांसोबत आहे. आणि हे त्या निवृत्त होणार आहेत. त्याच बॅचमधली एक मुलगी मुख्याध्यापकांना निवृत्तीच्या दिवशी भेट म्हणून 1995 च्या बॅचच्या मुलांना परत बोलावून. व्हिडिओ देखील पाहण्यासारखे आहेत.
पेड़ बच्चों का रूप होते हैं? यह Parle G के Ad में देखिए बच्चों का अपने गुरु से ख़ास सम्बंध। टीचर का अपने शिष्यों की तरफ़ ऐसा लगाव!
भारत की संस्कृति में माता पिता के बाद सबसे बड़ा गुरुओं का दर्जा होता है।
ये वीडियो देखकर मुझे मेरे गुरू और टीचर याद आ गये जिन्होंने मुझे जीवन की… pic.twitter.com/LJwEbegGmt— Satnam Singh Sandhu (@satnamsandhuchd) September 2, 2024
ॲडला मिळाले भरभरून प्रेम
पार्लेने ही जाहिरात त्यांच्या यूट्यूब चॅनलवर 29 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली. ही जाहिरात शिक्षक दिनाला डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली आहे. ही जाहिरात हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये देखील आहे. ही जाहिरात मोठी असल्याने टिव्हीवर दाखवण्यात आली नाही. मात्र सोशल मीडियावर अनेकांनी ही जाहिरात पाहिली आहे. राज्यसभेचे खासदार सतनाम सिंह संधू यांनी देखील हा व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तसेच एका युजरने म्हटले आहे की, खरच खूप छान व्हिडीओ आहे, ही केवळ पार्लेजीची जाहिरात नाही तर, झाडे लावण्याचे महत्त्व सांगणारा सशक्त संदेश आहे. तसेच आणखी एका युजरने म्टले आहे की, पार्लेजीची छान जाहिरात. हे पाहिल्यानंतर तुमच्या शाळेच्या किंवा महाविद्यालयीन शिक्षकाचा विचार न करणे कठीण आहे!”