जमिनीच्या उत्खननात सापडले दोन भयावह सांगाडे अन् 2000 वर्षांचं रहस्य उलगडलं
या जगाला रहस्यमयी गोष्टींचा पिटारा म्हटले जाते. कारण जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांबाबत आपण कधी ऐकलेही नसावे. आपल्याला वाटते आपण जेवढे जग पहिले जग फक्त तेवढेच आहे मात्र असे नाही. हे जग अनेक गोष्टींनी भरपूर आहे, यातील अनेक गोष्टींचे रहस्य आजवर मानव उलगडू शकला नाही. आपण कधी विचार केला आहे का की आपल्या आधी हजार-दोन हजार वर्षे जगलेल्या लोकांबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही.
अशा परिस्थितीत जेव्हा आपल्यासमोर जुना इतिहास मांडणारी एखादी गोष्ट सापडते, तेव्हा आपल्याला त्याबद्दल आवडीने जाणून घ्यावेसे वाटत असते. सध्या असेच एक रहस्य समोर आले आहे. यात उत्खननादरम्यान एक अजब गोष्ट पुरातत्व शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आली आहे. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, पोम्पेईमध्ये उत्खननादरम्यान दोन सांगाडे सापडले आहेत. हे दोन्ही सांगाडे पाहून आता शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. हे दोन्ही सांगाडे एका खोलीत गाडले गेले होते आणि ते पाहताना असे वाटत होते की हे एका स्त्री आणि पुरुषाचे सांगाडे आहेत, ज्यांना खोलीत काही आपत्तीमुळे आपला जीव गमवावा लागला होता. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याजवळ काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या.
हेदेखील वाचा – पिसारा फुलवून नाचत होता मोर तेवढ्यात वाघाने केला हल्ला अन् पुढे जे झालं… Viral Video एकदा पहाच
ही घटना इसवी सन 79 मध्ये घडली असावी, जेव्हा व्हेसुवियस नावाचा ज्वालामुखी फुटला होता, असे सांगितले जात आहे. या काळात पळून जाण्यासाठी या दाम्पत्याने या खोलीचा आसरा घेतला असावा. संशोधकांच्या मते, त्याचे वय 35 ते 45 वर्षांच्या दरम्यान होते आणि आपत्तीच्या वेळी पळून जाताना त्याने काही सामानही सोबत नेले होते. बेडवर पडून महिलेचा मृत्यू झाला, तर भिंतीखाली दबून पुरुषाचा मृत्यू झाला. प्युमिस स्टोनच्या पावसापासून वाचण्यासाठी त्यांनी इथे आश्रय घेतला असेल पण ते सुटू शकले नाहीत. दोन्ही घटनांमध्ये, त्या पुरुषाचा आधी मृत्यू झाला होता आणि ती स्त्री तिच्या मृत्यूची वाट पाहत बेडवर पडली असावी, असे सांगण्यात येत आहे.
या जोडप्याने शेवटच्या क्षणासाठी काही सामानही सोबत ठेवले होते. महिलेकडून लोखंडी चाव्यांचा गठ्ठा सापडला आहे, तर तिने मुलांच्या जन्मावेळी वापरलेला तावीजही घातलेला होता. तिने कानात मोत्याचे झुमके घातले होते. या सांगाड्यांकडून काही सोन्याची, चांदीची आणि पितळेची नाणीही सापडली.