आषाढी वारीवरून घरी आलेल्या आईसाठी मुलाने घातल्या फुलांच्या पायघड्या
आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा. हिंदू धर्मात याला फार महत्त्व आहे. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी निमित्त भजन कीर्तन करत देवाचा नामघोष करत आपली वारी न चुकत पूर्ण करत असतात. 18 ते 20 दिवस सर्व सांसारिक वैभव, सुख सोडून फक्त ईश्वराच्या धानात राहणारे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहेत, तर अनेक दिवसांनी कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहिलेले वारकरी जेव्हा घरी पुन्हा येतात, तेव्हा घरच्यांचाही आनंद द्विगुणित होतो. असाच एक डोळे पाणवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे भरून आले आहेत.
व्हिडिओत जर आपण नीट पाहिले तर दिसते की, एल माणूस दुचाकी घेऊन येत आहे, त्याच्या मागे दुचाकीवर त्याची आई आपले सामान घेऊन बसल्याचे दिसते. यानंतर जेव्हा घरासमोर दुचाकी थांबते, सर्वांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येऊ लागते. याचे कारण म्हणजे, वारी करून आलेल्या आईचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण दार आणि घरचा रास्ता फुलांनी सजवलेला असतो. आई दुचाकीवरून उतरते, कठड्यावर तिचं सामान ठेवते, डोक्यावर साडीचा पदर घेऊन घराच्या पायऱ्या चढण्यास सुरुवात करते. त्यानंतर तिचा मुलगा आणि सून येतात आणि प्रथम तिच्या पाया पडतात. आषाढी वारी करून आलेल्या आईचे असे सुंदर स्वागत पाहून आता अनेकजण सुखावेले आहेत.
हेदेखील वाचा – बॉयफ्रेंडसोबत बोलता बोलता ट्रेनखाली आली महिला, अंगावरून ट्रेन गेली अन् …चित्तथरारक घटनेचा Video Viral
आईचा आदर करणारे आणि तिच्यासाठी काही तरी करू पाहणारे मुली सध्याच्या काळात जणू विलिप्त होऊ लागली आहेत. त्यातच आजचा हा व्हायरल व्हिडिओ आई-मुलाच्या नात्यातील गोडवा पुन्हा जिवंत करून जातो. आपल्या मुलाने केलेल्या लहान गोष्टींचेही आईला फार कौतुक वाटत असते. आपले वारीचे महत्त्व समजून आपल्यासाठी केलेले हे लहान का होईना पण प्रेमापोटी केली ही धडपड पाहून आईलाही यावेळी हसू अनावर झालेले व्हायरल व्हिडिओत दिसते.
या घटनेचा व्हिडिओ @lay_bhari_official नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 30 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी या व्हिडिओला शेअर देखील केले आहे. या व्हिडिओला, माऊलीची वारी खऱ्या अर्थाने सफल संपन्न झाली…! असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातीलच एकाने लिहिले आहे, मी एक मुस्लिम आहे. पण हा व्हिडिओ बघून मन प्रसन्न झाले. तुम्ही आईची इतकी सेवा करता. छान.