हसत खेळत वातावरण दुःखात बदललं! दुकानदाराला आला हृदयविकाराचा झटका, खुर्चीवरच कोसळला अन् मृत्यूचा Live Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत . इथे कधी भयानक स्टंट्स शेअर केले जातात तर कधी हास्यापद गोष्टी शेअर होतात ज्या पाहून आपल्याला आपले हसू अनावर होईल . याच बरोबर इथे अनेकदा अशा काही घटनाही शेअर होतात ज्यातील दृश्ये आपल्याला थक्क करतील. सध्या असाच एक थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. यात एका दुकानदाराच्या मृत्यूचे लाइव्ह फुटेज शेअर करण्यात आले आहे. हा मृत्यूचा थरार आता वेगाने व्हायरल होत असून लोक यातील दृश्ये पाहून हादरले आहेत.
सध्याच्या जगात लोकांच्या आरोग्याच्या समस्या फार वाढल्या आहेत. कधी कुणाचं काय बरंवाईट होईल हे आजकाल सांगता येत नाहीत. अनेकदा असेही घडते की, अचानक अशा व्यक्तीचे निधन होते की ज्याचा आपण स्वप्नातही विचार केला नसावा आणि मग अशा घटना जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला धक्का बसतो. आजकाल लोक आरोग्याच्या समस्यांमुळे फार लवकर मृत्यूला बळी पडत आहेत. हेच दृश्ये नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडिओतही घडल्याचे समजते, ज्यात दुकानदाराचा अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे दिसून आले. त्याच्या मृत्यूचा लाइव्ह थरार आता सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
नक्की काय घडले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका दुकानातील काही दृश्ये दिसतील, ज्यात या दुकानातील दुकानदार खुर्चीवर बसलेला आहे तर दोन ग्राहक दुकानदाराशी बोलताना दिसत आहेत. आतापर्यंत सर्व वातावरण नॉर्मल असत मात्र काही वेळातच काळाचा घाला दुकानदारावर पडतो आणि नको ते घडून बसत. पुढच्याच क्षणी यात दिसते की, बोलता-बोलता दुकानदार दुकानात असलेल्या काउंटवर अंग टाकुन देतो, त्याला पाहून ते ग्राहक त्याच्या दिशेने पाहतात मात्र काही वेळात दुकानदार खुर्चीवरुन खाली कोसळणार असतो तेवढ्यात तिथे सर्व येऊन त्याला पकडतात. मात्र यावेळी त्याचा जागीच मृत्यू झालेला असतो. हा सर्व थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि याचेच फुटेज आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.’
कासगंज📍
दुकानदार को अचानक दिल का दौरा पड़ने से मौत pic.twitter.com/GffANDNYpJ
— Priya singh (@priyarajputlive) January 17, 2025
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @priyarajputlive नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘दुकानदाराचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे जग सोडायला काही सेकंद लागत नाहीत! हृदयविकाराच्या वाढत्या घटना हा चिंतेचा विषय बनला आहे. लवकरच याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बापरे, हे कसं शक्य आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.