चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक वाघसंख्या असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाघांच्या घटनांमुळे चंद्रपुर जिल्ह्यामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. २३ नोव्हेंबर रोजी वाघाने एका ५४ वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात वाघ-बिबट्या आणि मानव-पशुधन संघर्षामुळे १७,०४४ जणांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक कारणे, अपघात आणि शिकारीमुळे ११२ वाघ आणि ३९७ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.