(फोटो सौजन्य: Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बलिया येथील बारगाव मनियारमध्ये घडून आली आहे. इथे मालकाने आपल्या म्हशीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक पार्टी अरेंज केली. यात लोकांना आमंत्रण करण्यात आलं, केक आणण्यात आला आणि म्हशीला वाढदिवसाची टोपीही घालण्यात आली. व्हिडिओमध्ये घराच्या प्रवेशदारावर रंगीबेरंगी फुगे आणि फुलांच्या माळा लावल्या होत्या. बसंतीने चमकदार गुलाबी रंगाची वाढदिवसाची टोपी घातली होती आणि तिच्या गळ्याच फुलांचा हार देखील घालण्यात आला होता. टेबलावर दोन केक ठेवलेले असतात. व्हिडिओत वाढदिवस साजरा करण्यासाठी जमलेल्या लोकांची गर्दी देखील दिसून येते. मालक म्हशीला केक कापण्यासाठी टेबलाजवळ आणतो आणि सर्वजण एकसुरात हॅपी बर्थडे गाण गाऊ लागतात. यानंतर मालकाने केक कापला आणि बसंतीला हा केक खाऊ घातला. बसंतीनेही मोठ्या आवडीने हा केक खाल्ला. ही संपूर्ण घटना काहीशी अनोखी असली तरी यात लोकांचा आनंद आणि प्राण्यासाठीचे प्रेम दिसून येते जे व्हिडिओला आणखी खास बनवते.
View this post on Instagram
दरम्यान ही घटना @cultindians नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. माहितीनुसार, गावकऱ्यांनी बसंतीचा चाैथा वाढदिवस साजरा केला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर आता वेगाने शेअर केला जात असून यातील म्हशीच्या वाढदिवसावर यूजर्सने आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “याला म्हणतात माणूसकी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मालकाचा म्हशीवर जास्तच जीव आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “म्हशीचा वाढदिवस! अनोखं आहे पण पाहून फार छान वाटलं”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






