पुतळ्यासोबतचे महिलेचे अश्लिल कृत्य होतंय Viral,
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. यातील अनेक गोष्टी आपल्याला हसवतात तर काही थक्क करून जातात. काही लोक व्हायरल होण्यासाठी किती खालच्या पातळीवर उतरू शकतात, याचे उत्तम उदाहरण आपल्याला व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते. सध्या असाच एक धक्कादायक आणि लज्जास्पद फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून अनेकजण संतापले आहेत आणि यावर आपला निषेध व्यक्त करत आहेत.
इटली हा युरोपातला सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न असलेला देश आहे. दरवर्षी जगभरातील अनेक पर्यटक इथे पर्यटनासाठी येत असतात. इथे पर्यटकांना सुंदर आणि मुक्त वातावरणाचा आनंद अनुभवता येतो मात्र याच गोष्टीचा काही पर्यटक गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. यावेळी एक महिला पर्यटक फ्लॉरेन्स शहरातील एका एका प्रसिद्ध पुतळ्यासोबत अपमानास्पद आणि लज्जास्पद कृत्य करताना दिसली आहे. तिचा हा आक्षेपार्ह फोटो आता फार वेगाने व्हायरल होत आहे. तीचे हे कृत्य पाहून फ्लॉरेन्स शहरातले नागरिक पर्यटकांच्या नाराज झाले असून, आता कठोर नियम बनवण्याची मागणी करत आहेत.
व्हायरल झालेला फोटो पाहिला तर त्यात दिसते की, एक महिला समोर असलेल्या पुतळ्यावर चढली आणि त्याचे चुंबन घेऊ लागली. एवढेच नाही तर, पुतळ्यासोबत पुढे ती अनेक अश्लील कृत्य करते. तीची महिला जोडीदार यावेळी खाली उभी राहून तीचे फोटो क्लिक करते, जणू ही किती चांगली गोष्ट आहे. यानंतर दुसरी महिला पुतळ्याजवळ जाते आणि घाणेरडे कृत्य करू लागते. यांनतर एका स्थानिक व्यक्तीने त्यांच्या या कृत्याचे गुपचूप फोटो क्लिक केले आणि सोशल मेडियावर पोस्ट केले. त्यानंतर हे प्रकरण जगासमोर आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा पुतळा फ्लॉरेन्स शहरातल्या बोर्गो सॅन जॅकोपो इथल्या बॅकस ऑफ जिआम्बोलोग्ना (Giambologna’s Bacchus) नावाचा पुतळा होता. आता हे सर्व कृत्य पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. नागरिकांमधील संताप टोकाला पोहचला असून त्यांनी या दोन्ही महिलांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेदेखील वाचा – मगरीसोबतची मस्ती पडली महागात, जबडा उघडला आणि क्षणार्धात… Video Viral
या कृत्यानंतर एका स्थनिकाने आपली प्रतिक्रिया देत लिहिले की, फ्लोरेन्स हे असे शहर आहे जिथे येणाऱ्या पर्यटकांवर कोणतेही नियम लादले जात नाहीत. प्रत्येकाला वागण्याचे आणि वावरण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच पर्यटक इथे येऊन उद्धट आणि विचित्र वागतात. आता परिस्थिती फार बिघडत चालली आहे. देशात सिंगापूर मॉडेल राबवण्याची आणि त्याची अंमलबजावणी सुरू करण्याची गरज आहे. असे केले तरच ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी पर्यटक शिस्तता बाळगतील.
A Firenze una ragazza si è arrampicata sulla statua del Giambologna mimando un atto sessuale.
Si tratta di una trasfigurazione: quando l’arte è più vera della vita.
Una esaltazione amorosa.
Nessun uomo reale può competere con il Perseo di Cellini.
Una ragazza ubriaca compie un… pic.twitter.com/EvUUBkl20v— Vittorio Sgarbi (@VittorioSgarbi) July 16, 2024
दरम्यान ज्या पुतळ्यावर या महिला दुशकृत्य करताना दिसल्या, तो पुतळा बॅकसच्या मूळ कांस्य पुतळ्याची प्रतिक्रिया आहे. 1560 च्या दशकात जिआम्बोलोग्ना यांनी ती कलाकृती बनवली होती आणि बारगेलो संग्रहालयात तीला ठेवण्यात आले होते. नंतर 2006 मध्ये त्याच्या जागी एक प्रतिकृती बसवण्यात आली.