Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमध्ये 'केळवण'चा जल्लोष? वधूसाठी महिलांनी केला अनोखा सोहळा

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांनी होणाऱ्या वधूसाठी लग्नापूर्वीचा खास सोहळा साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ट्रेन मध्ये महिलांचा डबा फुगे आणि फुलांनी सजवण्यात आला आहे. महिलांनी गाणी गात, नाचत आणि वधूला हळद लावत आनंद साजरा केला.
Mumbai Local Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
Mumbai Local Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया Mumbai Local Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
Published on: 
Updated on: 
  • महिला डबा फुगे आणि फुलांनी सजवलेला

  • 'केळवण' म्हणजे विवाहपूर्व केली जाणारी कौटुंबिक प्रथा

  • सोशल मिडियावप युझर्सच्या प्रतिक्रिया

Mumbai Local Viral Video : मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेन गर्दी आणि धावपळीसाठी ओळखली जाते. पण एकीकडे लोक हल्ली ट्रेन मध्ये लग्नसमारंभाचे कार्यक्रम करताना दिसत आहेत. एका धावत्या लोकल ट्रेनमध्ये काही महिलांनी लग्नापूर्वी साजरा होजणारा 'केळवण' हा सोहळा साजरा करत दिसत आहे. त्याचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

महिला डबा फुगे आणि फुलांनी सजवलेला

या व्हायरल व्हिडिओमध्ये एका लोकल ट्रेनच्या महिला डबा फुगे आणि फुलांनी सजवलेला दिसत आहे. होणारी वधू तिच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांनी वेढले आहे. या व्हिडिओत वधू मध्यभागी बसलेली आहे. सर्वजण गाणी म्हणत टाळ्या वाजवत आहेत. तर कोणी नाचत आहेत. काहीजणी वधूला हळद लावत आहेत, तर काही महिला तिला भेटवस्तू देताना दिसत आहेत. संपूर्ण डबा एखाद्या लग्नमंडपासारखा दिसतो आहे. महिलांनी वधूसाठी खास गाणी गायली आणि तिच्यासोबत सेल्फी व रील्स काढले.

Mumbai Local Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

'केळवण' म्हणजे विवाहपूर्व केली जाणारी कौटुंबिक प्रथा

'केळवण' हा महाराष्ट्रातील कोकण आणि गोव्यातील एक पारंपारिक विवाहपूर्व केली जाणारी कौटुंबिक प्रथा आहे. 'केळवण' हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा लग्नापूर्वी विधीसारखाच सोहळा आहे. या सोहळ्यात, वधूला लग्नाच्या काही दिवस आधी आमंत्रित केले जाते आणि तिला विशेष जेवण आणि भेटवस्तू दिल्या जातात आणि आशीर्वाद दिला जातो. या महिलांना वाटले, की रोज एकत्र प्रवास करत असतानाच हा विधी का साजरा करू नये? 'केळवण' हा महाराष्ट्रातील कोकण आणि गोव्यातील एक पारंपारिक विवाहपूर्व केली जाणारी कौटुंबिक प्रथा आहे

सोशल मिडियावप युझर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ व्हायरल होताच, लोक दोन गटांमध्ये विभागले गेले. एका गटाला हा व्हिडिओ खूप आवडला आहे. लोक लिहित आहेत, "हीच खरी मुंबईची भावना आहे, लोकल ट्रेनमधील मैत्री, लोकल ट्रेनमधील उत्सव, वधूसाठी किती सुंदर सरप्राईज आहे." दुसरा गट प्रश्न उपस्थित करत आहे. लोक म्हणतात, "ट्रेन हे एक सार्वजनिक ठिकाण आहे. इतर प्रवाशांना नक्कीच गैरसोय झाली असेल. जर सगळ्यांनीच ट्रेनमध्ये पार्टी करायला सुरुवात केली तर काय होईल?

उत्सव साजरा करणे योग्य आहे, पण इतरांच्या जागेवर अतिक्रमण करणे बरोबर नाही." मुंबई लोकल ट्रेनमध्ये असे घडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही लेडीज स्पेशल ट्रेनमध्ये महिलांनी वाढदिवस, निरोप समारंभ आणि सण साजरे केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. रोज एकाच ट्रेनने प्रवास करणाऱ्या महिला हळूहळू एका कुटुंबासारख्या बनतात.

Mumbai Local Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
Vrindavan Viral Video : वृंदावनमध्ये ई-रिक्षाच्या भाड्यावरून राडा; महिलेला क्रूर मारहाण