(फोटो सौजन्य: Instagram)
काय आहे प्रकरण?
तर नक्की प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला याविषयी सविस्तर जाणून घ्यावे लागले. सुमारे पाच वर्षांपूर्वी एका कुटुंबाचा लाडका मुलगा अचानक गायब झाला होता. कुटुंबाने खूप प्रयत्न केले पण पोलिसांच्या शोधमोहिमेतही त्याचा काही थानपत्ता लागला नाही. हळूहळू वर्षे सरत गेली आणि लोकांना वाटले की. कदाचित तो पुन्हा कधीच परत येणार नाही. पण म्हणतात ना, जेव्हा सर्व दार बंद होतात तेव्हा देवाचे दार उघडे होते. बहिणीच्या प्रेमाने अखेर पाच वर्षांनंतर देवीच्याच दारी तिच्या भावाची भेट करुन दिली. सांगितले जात आहे की, जेव्हा बहिण वैष्णो देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती तेव्हा तिथे तिला तिचा अचानक गायब झालेला भाऊ भेटला. पायऱ्या चढत मंदिरात जात असताना वाटेतच तिची भावासोबत भेट झाली. त्याचे कपडे फाटलेले होते आणि तो बिकट परिस्थितीत असल्याचे दिसले. आपल्या असहाय्य भावाला ओळखताच बहिणीला अश्रू अनावर झाले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. हा सर्व प्रकार पाहून आजूबाजूचे लोकही थक्क झाले. ही घटना आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक याला आदिशक्तीचा चमत्कार मानत आहे.
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @gulzar.ae.zindagii नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘५ वर्षांची प्रतीक्षा… आणि अखेर, हा क्षण. वैष्णोदेवीच्या पवित्र तीर्थस्थानी, एका बहिणीची तिच्या खूप काळापासून दुरावलेल्या भावाशी पुनर्भेट झाली. ही केवळ एक भेट नव्हती—तर तो श्रद्धा, प्रार्थना आणि एका निखळ चमत्काराचा क्षण होता. कधीकधी आयुष्य आपल्याला एकमेकांपासून दुरावते… पण खरी नाती आणि अढळ विश्वास नेहमीच पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग शोधून काढतात.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “भावाने घरी परतण्याचा प्रयत्न का केला नाही? किंवा अगदी पाच वर्षे घरी फोनही का केला नाही?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण त्यांना पाहून तिचा भाऊ मात्र पूर्णपणे सुन्न झाला आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दारात मोठा चमत्कार जय माँ वैष्णो देवी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






