इन्स्टंट कर्मा! चोरी करायला गेला अन् जन्मभराची अद्दल घडली, पाहा नेमकं काय घडलं पठ्ठ्यासोबत? Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पठ्ठ्याला चोरीचा प्रयत्न चांगला अगंलट आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने रात्रीच्या वेळी क्लिनिकमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्याने रेलिंगच्या शटर तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी तो शटरमध्ये अडकून राहिल्याने त्याला स्वतची सुटका करुन घेण्यासाठी आसपासच्या लोकांना बोलवावे लादले. या चोराची मानच शटरमध्ये अडकली होती. यामुळे त्याला रात्रभर आसपास कोणीही नसल्याने तसेच अडकून राहावे लागले. सकाळी या घटनेकडे लोकांचे लक्ष गेल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की घटनास्थळी तेथून जाणारे लोक चोराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या देखील दाखल झाल्या होत्या. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर चोराला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
व्हायरल व्हिडिओ
In Ghaziabad, Uttar Pradesh, a thief got his neck stuck in a clinic’s metal rolling shutter while breaking in last night. He hung there until afternoon, when firefighters rescued him using a ladder. pic.twitter.com/YnmrZT4IrO — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 11, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी चोराची चांगलीच फिरकी घेतली आहे. एका नेटकऱ्याने क्या चोर बनेगा रे तु अशी मजेशीर कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने याला म्हणतात इन्स्टंट कर्मा असे म्हटले आहे. तर एकाने आता आयुष्यभर चोरीचा विचारही करणार नाही असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
युद्धात होरपळले बालपण! चिमुकल्यांचा मरणाचा खेळ पाहून तुमचेही हृदय पिळवटेल, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख दत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






