(फोटो सौजन्य: Instagram)
पाळीव प्राण्यासाठी तयार केली पाणबुडी
हा चमत्कार एका व्यक्तीने आपल्या पाळीव प्राण्यासोबत करुन दाखवला. त्याने आपल्या पाळलेल्या पोपटासाठी एक अनोखी पाणबुडी तयार केली आणि यात त्याला बसवून पोपटाला समुद्राखालील जगाची सफर करुन दिली. बहामासच्या स्वच्छ निळ्या पाण्यात स्कूबा डायव्हिंग करणाऱ्या या पोपटाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओला पाहताच यावर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी व्हिडिओतील दृष्यांवर आपले आश्चर्य व्यक्त केले तर काहींनी पोपटाच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली.
व्हिडिओमध्ये आपल्याला पाण्यात एक छोटी पारदर्शक पाणबुडी हळूहळू पुढे जाताना दिसते. यात एक पोपट बसलेला असतो. ही पाणबुडी एका पारदर्शक पात्रापासून बनलेली असून, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाईप, व्हॉल्व्ह आणि इतर आवश्यक उपकरणांनी सुसज्ज आहे. ही संपूर्ण सिस्टीम पोपटाला समुद्राखाली विहार करण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी मदत करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या पोपटाने याआधीही १५ वेळा आकाशात स्कायडायव्हिंगचाही अनुभव घेतला आहे.
या घटनेचा व्हिडिओ @technology नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच शेअर केला जात आहे. याबरोबरच अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “मला वाटतं पोपटाला पाण्यात भिती वाटली असावी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो आजूबाजूला बघत असल्यासारखा दिसतोय. जर तो घाबरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं, नाही का? तो फक्त उत्सुक दिसतोय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






