(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
आताच्या युगात डेटींगची पद्धत फार बदलली आहे. याचे नवनवीन प्रकार समोर येत असून डबल डेटींग नावाचाही एक ट्रेंड तरुणांमध्ये खूप फाॅलो केला जात आहे ज्यात व्यक्ती एकाच वेळी दोन जणांना डेट करतो. आता ही डेटींग सांगून नाही तर दोन्ही पार्टनर्सना लपवून केली जाते, म्हणजेच प्रेम दोघींसोबत करायचं पण दोघींना भासवायचं की प्रेम तर फक्त तुझ्यासोबतंच करत आहे. आता बघायला गेलं तर ही एक प्रकारची फसवणूक किंवा एक खोट आहे आणि जेव्हा खोटं समोर येतं तेव्हा राडा तर होतोच. व्हिडिओतही असंही काहीसं घडल्याचं दिसून आलं.
प्रियकराच्या मृत्यूनंतर दोन्ही प्रयसी त्याच्या अंत्यविधीला हजर राहिल्या आणि इथेच त्यांना सत्यतेचा उलगडा झाला. दोघींना समजलं की त्यांचा प्रियकर एकाच वेळी दोघींना डेट करत होता. मग काय, सत्य समोर येताच दोघींमध्ये वाद सुरु झाला आणि प्रियकर कुणावर जास्त प्रेम करत होता या वादावरुन दोघींमध्ये जबर हाणामारी सुरु झाली. मुख्य म्हणजे, शवपेटीजवळच हा वाद सुरु झाला ज्यामुळे व्हिडिओत शवपेटी त्यांच्या हाणामारीमुळे हलताना, ओपन होताना दिसून आली. व्हिडिओमध्ये इतर लोक दोघींचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहताना दिसले पण कुणीही त्यांच्यातील हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
घटनेचा व्हिडिओ @cosmopolitanafrica नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मृत व्यक्तीसोबत आपण दोघींनीही प्रेमसंबंध ठेवले होते हे समजल्यावर, अंत्यसंस्काराच्या वेळी दोन महिलांमध्ये हाणामारी.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “पण तो तर आधीच निघून गेलाय; मग नक्की हे लोक कशासाठी भांडतायत?? मला वाटतं, त्याने आपल्या मागे काय सोडून ठेवलंय, याकडे एकदा तरी पाहायला हवं खूपच दुःखद”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाला मृत्यूनंतरही शांती मिळाली नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अगदीच अयोग्य वेळी सुरु झालेला वाद”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






