Viral Garba Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
कोणी जेठालाल बनून येतो, कोणी चंपकलाल बापूजी बनतो, कोणी एलियन बनतो तर कोणी सिंघमच्या ड्रेसमध्ये येतो. तुम्ही विचार पण करू शकणार नाही असे कपडे घालून लोक गरब्याला येतात. पण यावेळी एक पोरगा असा काही अवतार घेऊन आला आहे की त्याच्या समोर बाकी सगळ्यांचे कॉस्च्युम फिके पडले आहेत. हा तरुण चक्क अंगाला साबण लावून गरबा खेळत आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. makthakur_vlogs या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की एक तरुण फक्त कंबरेवर टॉवेल गुंडाळून उभा आहे. त्याच्या पूर्ण अंगाला साबणाचा फेस लावला आहे. जणू काही तो अंघोळ करत होता आणि अर्धी अंघोळ सोडूनच तो थेट गरबा खेळायला आला आहे. एवढंच नाही, तर गरबा खेळता खेळता तो मध्येच दात पण घासतो. त्याला पाहून तिथे असलेले सगळे लोक हसत आहेत, त्याची मजा घेत आहेत. पण तो पठ्ठ्या काही लाजत नाहीये. लोक जेवढे हसतात, तेवढाच तो अजून जोरात डान्स करतो. त्याचा कॉन्फिडन्स पाहून खरंच कमाल वाटते.
View this post on Instagram
हा व्हिडीओ आतापर्यंत 10 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. शेकडो लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, chinmay_patil1503 म्हणतो की या पोराचा आत्मविश्वास अफलातून आहे, एवढ्या लोकांमध्ये टॉवेलवर डान्स करणे सोपे नाही.
तर solanki_parimal म्हणतो की याला तर ऑस्करच द्यायला पाहिजे अभिनयासाठी. manjujain8975 ला हा व्हिडीओ खूपच भारी वाटला आहे. तर _rahul_patil.22 म्हणतो की याला गरब्यात 100 टक्के बक्षीस मिळालेच असणार.नवरात्रात असे मजेशीर व्हिडीओ दरवर्षी येतात, पण यावेळी या साबणवाल्या तरुणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण हसल्याशिवाय राहणार नाही.






