व्हायरल
मित्र-मैत्रिणींबरोबर थट्टा मस्करी ही नेहमीच होत असते. आपण आपल्या मित्रांसबरोबर अनेक वेगवगेळ्या प्रकारे मस्करी करायला बघतो मात्र ही मस्करी कधी कधी जीवावर बेतू शकते. असे म्हणतात प्रत्येक गोष्ट करताना आधी 100 वेळा त्या गोष्टीचा विचार करावा. एक लहान चूक जीवावर कशी बेतू शकते याचे उत्तम उदाहरण आहे आजचा हा व्हायरल व्हिडिओ. मित्रांबरोबर शुल्लक मस्ती करणं महिलेला फार महागात पडले आहे, ज्यामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. आता तिच्या मृत्यचा थरार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेदेखील वाचा – Viral: स्वतःवर गोळी झाडत भारतीय कॉन्स्टेबलने केली आत्महत्या, मरण्यापूर्वी शेअर केला हृदयद्रावक Video
ही घटना डोंबिवलीमध्ये मंगळवारी दुपारच्या सुमारास घडून आली. यात एका शुल्लक मस्तीमुळे एक महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत महिलेचे नाव नगीनादेवी मंजिराम असे आहे. मंगळवारी नगीनादेवी तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. यावेळी तिचा एक सहकारी तिच्यासोबत मस्करी करत होता आणि याच मस्तीत सहकाऱ्याचा धक्का तिला बसला आणि अचानक तोल गेल्यामुळे ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांनतर या सर्व घटनेचा व्हिडिओ जावळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि हाच व्हिडिओ आता हाच्या व्हिडिओ सोशल मीडियावर फार वेगाने व्हायरल होत आहे.
Shocking accident in Thane’s Kalyan-Dombivli area as woman dies after falling from third floor during friendly banter with friends. Devastating.#Maharashtra pic.twitter.com/bDx2UWYfgl
— Sonu Kanojia (@NNsonukanojia) July 17, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व, कल्याण-शीळ रोडवर विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी ही महिला साफसफाईचे काम करत होती. याच जागी तिच्यासोबत ही घटना घडून आली. नगीनादेवी डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या घटनेनंतर या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बंटी टाक विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे आणि या प्रकारचा पुढील प्रवास पोलीस करत आहेत. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @Sonu Kanojia नावाच्या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.